हायलाइट्स:

  • पोटच्या पोराने डोक्यात दगड घालून केला आईचा खून
  • गादीसह प्लास्टिमध्ये गुंडाळून फेकलं…
  • कारण ऐकून पोलिसही हादरले

सोलापूर : जन्मदात्या मुलानेचं झोपलेल्या आईच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत समोर आली आहे. एवढंच नाही तर खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गादीवरुन घराबाहेर ओढत आणून प्लास्टिकमध्ये गुंडाळून झुडपात टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे (वयवर्षे ४५,रा. वाणी प्लॉट,बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रीराम नागनाथ फावडे (वयवर्षे २१) असं आईच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मुलाचे नाव आहे.

या प्रकरणी पो. हवालदार अरुण माळी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याने मयत महिला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे हे दोघेजण सदर ठिकाणी राहत होते. तर लहान मुलगा व पती हे बार्शी शहरातील डंबरे गल्ली येथे वेगळे राहत होते. तसेच मोठा मुलगा व मयत रुक्मिणी यांच्यात पैशा वरुन नेहमी वाद होत होते. त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारी ही दाखल होत्या.
देवीच्या दर्शनासाठी निघाले पण वाटेत मृत्यूने गाठलं, बंधाऱ्यात कार कोसळून सासू-सासरे आणि सुनेचा मृत्यू
मयत महिलेचे पती नागनाथ फावडे व त्यांचा लहाण मुलगा लक्ष्मण यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेस्टस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच घरातील सर्व वापरते कपडे त्याने नेल्याचे लक्षात आल्याने, व यापुर्वीही त्याने आई व भावास मारहाण केल्याने सदर महिला रुक्मिणी हीस तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे यानेच त्याची आई मयत रुक्मिनी फावडे हीचा डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले असा संशय आहे.

दरम्यान, संशयीत आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे करत आहेत.
शिवलीला पाटीलचं किर्तन पडलं महागात, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here