मॉस्को: जगातील काही देशांमध्ये करण्यासाठी महासाथीच्या आजाराचे थैमान अजूनही सुरू आहे. करोना महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रशियामध्ये करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. रशियामध्ये मंगळवारी एकाच दिवसात करोनामुळे ९७३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. करोना महासाथीची सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत एकाच दिवसात करोनामुळे झालेल्या मृतांची ही सर्वोच्च संख्या आहे.

रशियामध्ये मागील काही दिवसांपासून करोना महासाथीचा आजार वेगाने फैलावत आहे. करोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी रशियात २८ हजार १९० करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत आतापर्यंत रशियात दोन लाख १८ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. युरोपीयन देशांमध्ये करोनामुळे सर्वाधिक मृत्यू रशियात झाले आहेत.

करोनावरील उपचारासाठी औषधाला मान्यता देण्याची मागणी

‘या’ लशीची ब्लू प्रिंट चोरून रशियाने तयार केली ‘स्पुटनिक व्ही’ लस; ब्रिटनचा खळबळजनक दावा
लसीकरणाचा कमी वेग

रशियन सरकारने करोना संसर्ग आणि करोना मृत्यूंसाठी कमी वेगाने होणाऱ्या लसीकरणाला जबाबदार ठरवले आहे. रशियन नागरिकांकडून लसीकरणासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सरकारने म्हटले की, देशात ४.७८ कोटी लोकांनी लशीचा किमान एक डोस घेतला आहे. तर, ४.२४ कोटी लोकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. रशियाची एकूण लोकसंख्या १४.६० कोटींच्या घरात आहे. रशियात करोना लसीकरणाला अपेक्षित वेगाने होत नसल्याने करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here