हायलाइट्स:
- अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा
- ठाकरे सरकारने जाहीर केली १० हजार कोटी रुपयांची मदत
- मदतीसाठी विलंब करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये होती नाराजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.
महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कशी असेल मदत?
– जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
– बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
– बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर.
दरम्यान, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times