हायलाइट्स:

  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मिळणार मदत
  • राज्याच्या नागरिकांना दरमहा मिळणार मदत
  • पुढची तीन वर्ष आश्रितांच्या खात्यात ५००० रुपये जमा होणार

तिरुअनंतपुरम: केरळचे मुख्यमंत्री पी विजयन सरकारनं करोना संक्रमणामुळे आपले प्राण गमावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबांना दरमहा आर्थिक मदत देण्याची घोषणा केलीय. विजयन सरकारकडून कोविड मृतांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांना दरमहा ५००० रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत अगोदरपासून मिळत असलेल्या आर्थिक मदतीपेक्षा वेगळी असेल. म्हणजेच, पीडित कुटुंबांना या अगोदर सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदतही उपलब्ध होणार आहे.

विजयन मंत्रिमंडळानं हा निर्णय बुधवारी जाहीर केला आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी हा लाभ मिळणार आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयासंबंधी केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृरित्या या निर्णयाची घोषणा करण्यात आली. ‘कोविड १९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या आश्रित दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत मिळेल. आश्रितांना समाज कल्याण, कल्याण कोष किंवा इतर पेन्शन उपलब्ध होणयासाठी अपात्र ठरवलं जाणार नाही. व्यक्तीचा मृत्यू हा राज्यात किंवा राज्याबाहेर किंवा देशाबाहेर झाला असेल तरी राज्याच्या रहिवाशांना हा लाभ मिळेल’, असं यात म्हटलं गेलंय.

vaccination : करोना लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागेल का? आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली माहिती
manmohan singh admitted : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये दाखल
हा लाभ मिळवण्यासाठी आश्रितांना एक अर्ज दाखल करावा लागेल. संबंधित जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना या कामाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. आश्रितांना लाभ ३० कामकाजी दिवसांच्या आत मिळेल. आश्रित कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसेल याची खातरजमा ग्राम अधिकाऱ्यांना करावी लागेल. निर्णय घेण्यासाठी अर्जदारांना कार्यालयात बोलावलं जाऊ नये, असं मुख्यमंत्री कार्यालयानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ अंतर्गत पुढची तीन वर्ष प्रत्येक महिन्याला ५००० रुपये थेट आश्रितांच्या खात्यात पोहचवली जाईल. जेव्हापर्यंत या योजनेसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जातो नाही तोवर मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीतून ही आर्थिक मदत दिली जाईल.

Tamil Nadu: कुटुंबात पाच मतदार… पण भाजप पदाधिकाऱ्याला केवळ एकच मत!
Govind Dotasara: ‘…तर महिला स्वत:ला पुरुषांच्या वरचढ समजू लागतात’, शिक्षणमंत्र्यांची वाचाळ बडबड

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here