हायलाइट्स:
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बटन दाबून केलं उद्घाटन
- आसामच्या तेजपूरपासून – अरुणाचल प्रदेशातील तवांगला जोडणारा ‘सेला बोगदा’
- तवांगद्वारे चीन सीमेपर्यंतचं अंतर १० किलोमीटरनं कमी होणार
- नदीखाली तयार करण्यात आलेला बोगद्याच्या स्वरुपातील देशातला पहिला रस्ते मार्ग
यावेळी, ‘जगातील सर्वात उंचीवर तयार करण्यात आलेला अटल बोगदा असो किंवा जगातील सर्वात उंच मोटरेबल पास (लेह – पँगाँग लेकला जोडणारा केला पास – १८,६०० फूट) असो किंवा अंतिम टप्प्यापर्यंत पोहचणारा सेला बोगदा असो… बीआरओची कामगिरी ही जगात अध्ययनाचा विषय ठरू शकते’, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.
दिल्लीतूनच बटन दाबून उद्घाटन
संरक्षण मंत्र्यांनी आज राजधानी दिल्लीतील ‘राष्ट्रीय युद्ध स्मारका’हून ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (BRO) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रॅली मोहिमेला झेंडा दाखवत रवाना केलं. सोबतच, संरक्षण मंत्र्यांनी इथूनच एक बटन दाबून सेला बोगद्यातील स्फोटासह या योजनेच्या अखेरच्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली.

‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (BRO) द्वारे मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली
तेजपूर ते तवांग जोडणारा भूमिगत रस्ता
सेला बोगद्याचं निर्माण कार्य जून २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सेला पासपासून जाणाऱ्या या बोगद्यामुळे तवांगद्वारे चीन सीमेपर्यंतच अंतर तब्बल १० किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. तसंच या बोगद्यामुळे आसामच्या तेजपूरपासून – अरुणाचल प्रदेशातील तवांग स्थित सेनेच्या ४ कोअर मुख्यालयापर्यंतच्या प्रवासाचा वेळ एक तासांनी कमी होणार आहे.
अरुणाचल प्रदेशावर नियंत्रण ठेवणारं सेनेचं ४ कॉर्प्स मुख्यालय आसामच्या तेजपूरमध्ये स्थित आहे. भारत चीन सीमेवर स्थित तवांग द्वारही तेजपूर आहे. आपात्कालीन परिस्थितीत तेजपूरपासून पश्चिम अरुणाचल प्रदेश पर्यंत पोहचणं सोपं व्हावं, यासाठी भूमिगत बोगदा तयार करण्यात आला आहे.
नदीखाली तयार करण्यात आलेला पहिला भूमिगत मार्ग
सेला बोगद्याची लांबी १२ – १५ किलोमीटर आहे. यासाठी तब्बल ५००० कोटी रुपयांची खर्च अपेक्षित आहे. सेला बोगदा हा एखाद्या नदीखाली तयार करण्यात आलेला बोगद्याच्या स्वरुपातील देशातला पहिला रस्ते मार्ग ठरतोय.
१९६२ च्या युद्धात चीनी सेनेनं अरुणाचल प्रदेशातील तवांग ओलांडत तेजपूरपासून २० किलोमीटर दूर अंतरापर्यंत पोहचण्याचं दु:स्साहस केलं होतं. मात्र, युद्ध समाप्तीच्या घोषणनेनंतर चीनी सेना माघारी फिरली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times