काबूल/दोहा: अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवलेल्या तालिबानसमोरील अडचणींत वाढ होत आहे. तालिबान सरकारला अद्यापही जगातील देशांनी मान्यता दिली नाही. तर, दुसरीकडे अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. या आर्थिक निर्बंधाच्या मुद्यावरून तालिबानने धमकी दिली आहे. तालिबान सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी याने म्हटले की, अफगाणिस्तानचे सरकार कमकुवत करणे कोणाच्याही हिताचे नाही. अफगाणिस्तानवरील निर्बंधाचा परिणाम जागतिक सुरक्षेवरही होईल असे मुत्ताकी यांनी म्हटले.

परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी नेतृत्वात इस्लामिक अमिरातचे एक शिष्टमंडळ कतारची राजधानी दोहामध्ये विविध देशांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करत आहे. अमेरिका आणि युरोपीयन दूतांसोबत झालेल्या एका बैठकीत तालिबानी नेत्यांनी इस्लामिक अमिरात अफगाणिस्तानवरील निर्बंध हटवण्याची मागणी केली. अफगाणिस्तानच्या बँकांना सामान्यपणे कामकाज करू देण्याची परवानगी मागितली.

भारत आणि तालिबानमध्ये चर्चा होणार? ‘या’ देशात बैठकीची शक्यता
मुत्ताकी याने म्हटले की, अफगाणिस्तानच्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देणे आणि अपूर्ण प्रकल्पांचे काम पुन्हा सुरू करणे ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी आम्ही जगातील देशांना सध्याचे निर्बंध हटवण्यासाठी आणि बँकांना पुन्हा एकदा सामान्यपणे कामकाज करू देण्यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्याचा आग्रह धरला असल्याचे मुत्ताकीने म्हटले.

तालिबान राजवटीत भक्तीचा गजर; हिंदू समुदायाकडून नवरात्रौत्सवाचे आयोजन
अमेरिकन आणि युरोपीयन दूतांसोबत झालेल्या बैठकीत अफगाणिस्तानमधील सध्याची स्थिती, अन्य देशांसोबतचे संबंध आणि सध्याचे आर्थिक संकट, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुत्ताकीने म्हटले की, अफगाणिस्तान सरकारला कमकुवत करणे कोणाच्याही हिताचे नाही. याचा नकारात्मक परिणाम जगाच्या सुरक्षेवर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अफगाणिस्तानमधून स्थलांतरही वाढण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here