हायलाइट्स:

  • आगामी वर्षात गोवा विधानसभा निवडणूक
  • अमित शहा गोव्याच्या दौऱ्यावर, देवेंद्र फडणवीस स्वागतासाठी विमानतळावर हजर
  • ‘नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी’ची पायाभरणी

पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर आहेत. या यात्रेदरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी‘ची पायाभरणी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी, गृहमंत्र्यांनी जनसभेला संबोधितही केलं. ‘देशाच्या सीमेवर हल्ला सहन केला जाणार नाही’, असं यावेळी अमित शहा यांनी उपस्थितांसमोर म्हटलं.

यावेळी, अमित शहा यांनी आपले दिवंगत सहकारी आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही आठवण काढली. संपूर्ण देश मनोहर पर्रिकर यांना दोन गोष्टींसाठी कायम स्मरणात ठेवेल. एक म्हणजे गोव्याला त्यांनी स्वत:ची ओळख मिळवून दिली आणि दुसरी म्हणजे त्यांना तीन्ही सेनेला ‘वन रँक, वन पेन्शन’चा अधिकार मिळवून दिला.

Charanjit Singh Channi: मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नात ड्युटीवर तैनात पोलिसांचा नशेत धिंगाणा, चार जण निलंबित
BSF Power Jurisdiction: BSF अधिकार बदलांवरून आपांपसात भिडले पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री
पूँछ भागात दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला तेव्हा भारतानं पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक करून जगाला संदेश दिला. भारताच्या सीमांसोबत छेडछाड करणं इतकी साधीसरळ गोष्ट नाही. नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतानं आपल्या सीमांची सुरक्षा आणि सन्मान सिद्ध केला, असं वक्तव्य गृहमंत्र्यांनी उपस्थितांसमोर केलं.

उल्लेखनीय म्हणजे, आगामी वर्षीत गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दोन सरकारी कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झालेले गृहमंत्री यावेळी राज्यातील निवडणूक तयारीचा आढावाही घेणार आहेत.

निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर

अमित शहा गोव्यात दाखल होण्यापूर्वीच भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी टी रवी बुधवारी इथं दाखल झाले होते. गुरुवारी, विमानतळावर गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी देवेंद्र फडणवीसही हजर झाले होते. भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोअर समिती, आमदार आणि पक्ष कार्यकर्त्यांसोबत गृहमंत्री अमित शहा काही बैठका घेणार आहेत.

तेजपूर ते तवांग : ‘सेला बोगद्या’च्या अखेरच्या टप्प्यातील कामाला सुरुवात, चीन सीमेवर मजबूत पकड
Tamil Nadu: कुटुंबात पाच मतदार… पण भाजप पदाधिकाऱ्याला केवळ एकच मत!

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here