हायलाइट्स:
- आर्यन खानचे लहानपणीचे फोटो व्हायरल
- ११ व्या वर्षी खेळात हारल्याने खूप रडला होता आर्यन
- फोटोत दिसला आर्यनचा उदास व निरागस चेहरा

आर्यन खान शाळेतील फुटबॉल टीमचा होता कॅप्टन
आर्यन खान ११ वर्षांचा असताना धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये फुटबॉल टीमचा कॅप्टन होता. त्यावेळी आर्यन खान खूप लहान आणि गोंडस दिसत होता. या फोटोंमध्ये तो खूप उदास व निरागस दिसत आहे, ज्याचे कारण म्हणजे त्याचा शाळेत झालेला पराभव. या फोटोते त्याच्या डोळ्यात अश्रुही दिसत आहेत. त्याच्या टीमचा सेंट झेविअर्सच्या टीमकडून पराभव झाला होता.

आर्यनच्या टीमला मिळाले होते दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक
या क्रिडा स्पर्धेत आर्यन खानची टीम पराभूत झाल्याने आर्यन खूप रडल्याचे फोटोत दिसत आहे. त्याच्या टीमला या स्पर्धेत द्वितीय स्थान मिळाले होते. सेंट झेविअर्सविरुद्ध आर्यनच्या टीमचा पराभव झाला असला तरीही आर्यनने प्रतिस्पर्धी टीमविरुद्ध गोल करून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले होते. तो एक चांगला खेळाडू होता.

आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे आणि अशा परिस्थितीत शाहरुख खान आणि गौरीची झोप उडाली आहे. रिपोर्टनुसार, शाहरुखच्या कुटुंबाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख आणि गौरी यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिवसभरात अनेक वेळा फोन करून आर्यनच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times