हायलाइट्स:
- पत्नीने पतीला मारहाण करून जखमी केलं
- कोल्हापूर शहरातील सदर बाजारातील घटना
- शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
विजय बसप्पा बिराजदार (वय ३९) हे फुलांचे गजरे विक्री करुन उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी सुनीता बिराजदार या घरी दसऱ्यासाठी कडाकण्या करत होत्या. बुधवारी रात्री विजय घरी आल्यावर त्यांनी ‘मला झोपायचे आहे. तुमचं कडाकण्याचे साहित्य बाजूला ठेवा’ असं सांगितलं. यावर त्यांच्या पत्नीने ‘तुम्हाला मी कडाकण्या करत आहे हे दिसत नाही का?’ असं प्रत्युत्तर दिल्यावर दोघांमध्ये वाद झाला.
यावेळी चिडलेल्या सुनीता यांनी पतीला शिवीगाळ केली आणि अंगावर धावून गेल्या. तसंच पोळपाट आणि लाटणे डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. या घटनेत विजय बिराजदार यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.
दरम्यान, या प्रकरणी पती विजय यांनी पत्नी सुनीता यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून या घटनेत अधिक तपास सुरू आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times