हायलाइट्स:

  • नवी दिल्ली – हावडा रेल्वे मार्ग बाधित
  • २१ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले
  • आग्रा ते लखनऊ इंटरसिटी एक्सप्रेस रद्द


कानपूर, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या कानपूर ग्रामीण भागात शुक्रवारी सकाळी एक मालगाडी रेल्वे रुळावरून घसरलीय. अंबियापूर रेल्वे स्टेशनच्या जवळ हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच जीआरपी पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली – हावडा रेल्वे रुळाच्या समांतर उभारण्यात आलेल्या फ्रेट कॉरिडोर ट्रॅकवर शुक्रवारी सकाळी ही मालगाडी घसरून ही दुर्घटना घडली. यामुळे जवळपास १०० मीटरपर्यंत डीएफसी ट्रॅकला तडा गेल्याचं समोर येतंय.

कानपूरला निघालेल्या मालगाडीला अंबियापूर रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला. गाडीचा वेग अधिक असल्यानं रेल्वे ट्रॅकलाही याचा फटका बसलाय. चालकानं मालगाडी रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु, मालगाडीतील सामान एकमेकांवर धडकलं आणि पाहता पाहताच रुळावरून मालगाडी खाली घसरली. यामुळे काही सामान बाजुलाच असलेल्या तलावातही फेकलं गेलं.

मालगडी कानपूरमध्ये उतरली

अपघातामुळे रेल्वे रुळांना तडा

lakhimpur kheri : लखीमपूरमध्ये काय घडलं त्या दिवशी? आरोपी मंत्रिपुत्राला घेऊन SIT घटनास्थळी
vaccination in india : करोना लसीकरण मोहीम; १०० कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण होताच विमानतळ, रेल्वे स्टेशनवर होणार उद्घोषणा
या अपघातामुळे नवी दिल्ली – हावडा अप आणि डाऊन असे दोन्ही मार्ग बाधित झाले आहेत. या रेल्वे रुळांवर तात्पुरतं रेल्वे संचालन थांबवण्यात आलंय.

अपघातात चालक आणि गार्ड सुरक्षित आहेत. त्यांनीच या अपघाताची माहिती त्वरीत कंट्रोल रुमला दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ या मार्गावरचं रेल्वे संचालन बंद केलं. या अपघातानंतर मार्गावरून प्रवास करणाऱ्या जवळपास २१ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर शुक्रवारी सकाळी रवाना होणारी आग्रा ते लखनऊ इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय.

Defense Companies: दसऱ्याला पंतप्रधानांकडून सात संरक्षण कंपन्यांचं राष्ट्राला समर्पण, कर्मचाऱ्यांचा मात्र बहिष्कार
President Kovind: राष्ट्रपती कोविंद द्रासमध्ये जवानांसोबत साजरी करणार विजयादशमी!

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here