नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान दिल्ली हरयाणा सीमेवर सोनीपत जिल्ह्यातील सिंघु सीमेवर एक धक्कादायक घटना घडलीय. शुक्रवारी सकाळी ५.०० वाजता एका तरुणाची मारहाण करत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर मृताचा एक हात-पाय कापण्यात आल्याचंही समोर आलंय. त्यानंतर हा मृतदेह शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळाच्या मागच्या बाजुला टांगण्यात आल्याचं उघड झालंय.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुख्य स्थळाच्या बॅरिकेडवर तरुणाचा मृतदेह बांधून टांगण्यात आलेल्या अवस्थेत आढळून आला. ठार मारण्यापूर्वी तरुणाला अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचं मृतदेह पाहून लक्षात येतंय. रक्तबंबाळ अवस्थेत हा मृतदेह सापडल्यानं पोलिसांसहीत अनेकांना धक्का बसला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शीखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब‘शी छेडछाड केल्याचा या तरुणावर आरोप आहे. शीख योद्धा समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘निहंगा‘ समुहावर या तरुणाच्या हत्येचा आरोप आहे. हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील कुंडली भागात ही हत्या करण्यात आलीय.

Uttar Pradesh: मालगाडी रुळावरून घसरून मोठा अपघात, जीवितहानी टळली
lakhimpur kheri : लखीमपूरमध्ये काय घडलं त्या दिवशी? आरोपी मंत्रिपुत्राला घेऊन SIT घटनास्थळी


घटनेचा व्हिडिओ समोर

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. यामध्ये निहंगा समाजातील व्यक्ती मृत तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. व्यक्तीच्या डाव्या हाताचा पंजा कापलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. मारेकरी व्यक्तींपैंकी काहींच्या हातात भाले दिसून येत आहे. तर मृत आरोपी तरुणाच्या चहुबाजुंनी मारेकरी उभे आहेत. तरुणाकडे त्याचं नाव आणि गावाबद्दल त्याची चौकशी करताना हे मारकरी व्हिडिओत आढळून येत आहेत. धक्कादायक म्हणजे, जखमी तरुणाच्या मदतीकरता एकही व्यक्ती समोर आला नाही.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागला. परंतु, या परिस्थितीतही प्रसंगावधान राखत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तसंच अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात धाडला आहे. परंतु, मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

मृतदेहाचे दोन्ही हात बॅरिकेडला बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळले. आंदोलनस्थळी उपस्थितांपैंकीच निहंग्यांनी ही हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.

संयुक्त किसान मोर्चाची बैठक

या घटनेनंतर ‘संयुक्त किसान मोर्चा’लाही झटका बसलाय. आज दुपारी १२.०० वाजता शेतकऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

President Kovind: राष्ट्रपती कोविंद द्रासमध्ये जवानांसोबत साजरी करणार विजयादशमी!
Defense Companies: दसऱ्याला पंतप्रधानांकडून सात संरक्षण कंपन्यांचं राष्ट्राला समर्पण, कर्मचाऱ्यांचा मात्र बहिष्कार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here