सांगली : स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. एक नंबर लोकसंख्या असलेला देश चीन आहे. जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्र आहेत. त्या सर्व राष्ट्रात बेशरमपणाचा देश म्हणजे हा हिंदुस्थान आहे आणि याची कोणाला लाज वाटत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. ते शुक्रवारी सांगलीत दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

यावेळी बोलताना भिडे म्हणाले, करोना म्हणजे चीन, पाकिस्तान या आपल्या शत्रू देशांनी भारतावर केलेला छुपा वार आहे. करोना हा प्रकार काही खरा नसून थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या राजकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती, तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते. पण दुर्दैवाने तसे नाही.
‘महाविकास आघाडीच्या दहा तोंडी रावणाचा अहंकारही महाराष्ट्रातील जनताच मोडेल’
समस्त मुस्लिम समाजाने आदिलशाही, निजामशही, कुतुबशाही यांनी आपल्या समाजाचे नुकसान केले आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी झटले. आता आपली वेळ आहे. यासाठी प्रयत्न करूया. जोपर्यंत हिंदू राष्ट्राची जाण असणारे शासन, सरकार सत्तेत येणार नाही, तोपर्यंत आपले हिंदू राष्ट्र निर्माण होणार नाही. हे सरकार गोव्यापासून मुंबई, कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत सर्व दारू दुकाने सुरू करू शकतात, तर मग आपल्या दुर्गा दौडीला परवानगी का नाकारली. दरम्यान, करोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी शिवप्रतिष्ठानची दुर्गा दौड होऊ शकली नाही. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी सांगलीत ध्वजपूजन केले. यावेळी संभाजी भिडे यांनी उपस्थितांसमोर बोलताना वादग्रस्त वक्तव्ये केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here