हायलाइट्स:
- जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर
- दिल्लीचा मृदुल अग्रवाल टॉपर; ३६० पैकी ३४८ गुण
- मुलींमध्ये आयआयटी दिल्लीचीच काव्या चोप्रा प्रथम
मुलींमध्ये आयआयटी दिल्लीचीच काव्या चोप्रा प्रथम आली आहे. तिला ३६० पैकी २८६ गुण प्राप्त झाले आहेत. जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्ड २०२१ च्या पेपर १ आणि पेपर २ मध्ये एकूण १,४१,६९९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी एकूण ४१,८६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल पुढील पद्धतीने पाहा –
– सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.
– यानंतर हायलाइट केलेल्या रिझल्टच्या पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर आपला रोल नंबर आणि जन्मतारीख भरून सबमिट करा.
– यानंतर समोर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
– निकाल सेव्ह करून डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊटही घेऊन ठेवा.
टॉपर्सची पीडीएफ फाइल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
JEE 2021 निकाल प्रेस रिलीझ
जेईई अॅडव्हान्स्ड निकालाच्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा.
आयआयटी प्रवेशासंबंधीच्या महत्त्वाच्या तारखांसाठी येथे क्लिक करा.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times