हायलाइट्स:

  • चोरीला गेलेले हजारो मोबाईल ‘या’ देशात पाठवले जातात, कारण…;
  • मुंबई गुन्हे शाखेकडून मोठा खुलासा
  • मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना अटक

मुंबई: भारतात दररोज हजारो मोबाईल चोरीला जातात, परंतु हे मोबाईल कुठे जातात हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण याचा आता मुंबई गुन्हे शाखेकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. इतर देशापेक्षा मुंबईत चोरीला गेलेले मोबाईल हे बांगलादेशात जास्त विकले जातात. ही माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या निदर्शनास आली आहे. बांगलादेशात या मोबाईलचं काय होतं, याचीही माहिती समोर आली आहे.

मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना अटक केल्यानंतर हा उलगडा झाला आहे. त्यांच्याकडून ४३ लाख रुपये किमतीचे २४८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. इतकंच नाहीतर अनेक लॅपटॉपही जप्त करण्यात आले आहेत. डीसीपी दत्ता नलावडे यांनी एनबीटीला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकल ट्रेन आणि बसमधून सामान्य प्रवाशांचे मोबाईल मोठ्या प्रमाणात चोरीला जात आहेत. चेंबूर युनिटला चोरीच्या डझनभर मोबाईल गोवंडीतील एका घरात ठेवल्याची माहिती मिळाली. तेव्हा गुन्हे शाखा अशा चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर वरिष्ठ निरीक्षक रवींद्र साळुंखे आणि पीएसआय संजय गायकवाड यांच्या पथकाने तेथे छापा टाकला आणि तेथून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले.

हे मोबाईल बांगलादेशातून इतर देशांमध्येही पाठवले जातात

जेव्हा आरोपीची चौकशी केली गेली, तेव्हा त्याने सांगितले की, तो चोरी करत नाही, परंतु जे चोरी करतात त्यांच्या टोळीच्या सदस्यांकडून स्वस्त दरात खरेदी करतो. नंतर, टोळीशी संबंधित लोक त्यांना दिल्ली आणि आग्रा येथील त्यांच्या काही सहकाऱ्यांकडे पाठवतात. हे साथीदार हे चोरलेले मोबाईल घेऊन कोलकात्याला जातात. कोलकात्यातील मालदा येथून टोळीचे सदस्य येतात. हे मोबाईल घेतात आणि नंतर सीमा ओलांडून बांगलादेशातील इतर टोळीच्या सदस्यांना देतात. बांगलादेशातून हे मोबाईल नंतर इतर देशांनाही पाठवले जातात.

या टोळीचा म्होरक्या समीर शेख आहे. त्याच्यासह मोहम्मद वाजू शेख, मोहसीन अब्दुल शेख आणि सनी यादव यांनाही अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात असे समोर आले की, एमएमआर प्रदेशात चोरलेले बहुतांश मोबाईल याच टोळीने विकत घेतले होते. यूपी, तिरुपती येथून चोरलेले अनेक मोबाईलही मुंबईतील या टोळीला पाठवले होते.

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
… मग मोबाईल ट्रेस करणे अशक्य आहे

चोरलेले मोबाईल बांगलादेश आणि तिथून इतर देशांमध्ये का पाठवले गेले? खरंतर, जेव्हा जेव्हा मोबाइल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली जाते, तेव्हा पोलीस चोरी झालेल्या मोबाईलचा IMEI नंबरद्वारे मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात. जो कोणी त्या IMEI क्रमांकासह मोबाईलमध्ये सिम टाकतो, पोलिसांना सिम व्यक्तीचे नाव, पत्ता आणि लोकेशन समजतं.

वरिष्ठ निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चोरलेले मोबाईल जर देशातच असेल तरच आपण अशा लोकांना पकडू शकतो. पण चोरीला गेलेला मोबाईल परदेशात गेला, तर त्याचा शोध घेणे शक्य नाही. मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीच्या लोकांनाही याची जाणीव आहे, त्यामुळे काही काळासाठी चोरलेले मोबाईल बांगलादेश किंवा नेपाळमध्ये पाठवून विकले जातात.
‘महाविकास आघाडीच्या दहा तोंडी रावणाचा अहंकारही महाराष्ट्रातील जनताच मोडेल’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here