mosambi market rate today jalna: जालन्याची मोसंबी आता दिल्लीच्या मार्केटमध्ये, उत्पादकांना मोठा दिलासा – jalna citrus now in delhi market a big relief to growers
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून जालनापासून शेतकऱ्यांसाठी २५ टन रेल्वेच्या बोगिची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोसंबी, सीताफळ, द्राक्षे, डाळिंब हे दिल्ली, राजकोट, सुरत, अमृतसर या ठिकाणी पाठवता येत आहे. या बाजारपेठेत दुपटी-तिपटीने भाव मिळत असल्यामुळे शेतकरी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानत आहे. आजच सचखंड एक्सप्रेस ने जालन्यातील मोसंबी दिल्लीकडे रवाना झाली.
कृषी विभागाच्या प्रयत्नातून जिल्ह्यात उभ्या राहिलेल्या उत्पादक कंपन्यांची चळवळ आता चांगलाच जोर धरू लागली आहे. जालना जिल्ह्यामध्ये बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मोसंबी, सीताफळ रेल्वेने दिल्ली येथील बाजारपेठेत पाठविण्यात येत आहे. जालना मोसंबी उत्पादनासाठी अग्रेसर असून जिल्ह्यातील मोसंबी आता राज्याबाहेरील बाजार पेठेत जाऊ लागल्याने अडचणीत सापडलेल्या मोसंबी उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे. चोरीला गेलेले हजारो मोबाईल ‘या’ देशात पाठवले जातात, कारण…; मुंबई गुन्हे शाखेकडून मोठा खुलासा जालना येथील बी.पी.जी अर्थात बळीराजा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून फळ उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठी संधी मिळाली आहे. मोसंबीची प्रतवारी करून विशिष्ट पॅकिंगमध्ये ही मोसंबी पाठवली जात आहे व बाहेरील राज्यात त्यांना दुप्पट तिप्पट भावही मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न याची हमी मिळाल्याचे बळीराजा उत्पादक कंपनीचे भास्कर पडूळ यांनी सांगितले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times