परभणी : राज्यात काही झालं तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. वारंवार समोर येणाऱ्या महिला अत्याचारामुळे आता कुठेही महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात २१ वर्षीय विवाहित महिलेवर ३५ वर्षीय तरुणाने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्ष विवाहित महिलेवर गंगाखेड शहरातील ३५ वर्षीय आरोपी रोहित पंडित यांनी नगरेश्वर गल्ली येथील गंगाधर बापू यांच्या वाड्यात वारंवार बलात्कार केला. काही वर्षांआधी झालेल्या शारीरिक संबंधांचे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवतो म्हणून ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केल्याची पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
८ मे २०२१ रोजी दुपारी तीन वाजता २२ जुलै २०२१ या दरम्यान जबरीने संबंध केल्याचा पीडितिने दिलेल्या फिर्यादीत उल्लेख केला आहे. दरम्याम, गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपी रोहीत पंडीत यांच्या विरोधात कलम ३७६, ५०४ आणि ५०६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर या करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here