करोनासंदर्भात पंतप्रधान मोदींनी ट्विट केलंय. ‘सुरक्षेच्या छोट्या-छोट्या गोष्टींचे पालन करा आणि करोनापासून आपला बचाव करा. घाबरू नका’, असं मोदींनी म्हटलंय. ‘करोनासंदर्भात आज बैठक बोलावली होती. यात सरकारच्या वेगवेगळे मंत्रालयांशी आणि राज्य सरकारांशी चर्चा केली. यात करोनासंबंधी तयारीचा आढावा घेण्यात आला. सर्वांननी एकजूट होऊन करोनाशी लढा देऊ या. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवली जात आहे’, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.
करोनापासून आपला बचाव कसा कराल? याच्या काही सूचना पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिल्या आहेत.
पाहा मोदींनी दिल्या या सूचना….
१. आपले हात कायम स्वच्छ धुवा.२. बाहेर फिरताना आणि इतरांशी संवाद साधताना ठराविक अंतर ठेवा.३. डोळे, नाक आणि तोंडाला हाताचा स्पर्श टाळा.४. शिंकताना आणि खोकलताना कायम रुमाल किंवा टिशू पेपरने तोंड आणि नाक झाका.५. तुम्हाला ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरीत औषधोपचार घ्या.६. डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळा आणि त्यांच्या संपर्कात राहा.
यासह पंतप्रधान मोदींनी अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबरही दिला आहे. आरोग्य मंत्रालयात करोनासंदर्भात कंट्रोल रूम बनवण्यात आला आहे. इथून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, असं मोदींनी म्हटलंय.
1123978046 हेल्पलाइन नंबर करोनाच्या माहितीसाठी देण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times