परभणी : आज नवरात्रीचा शेवटचा दिवस त्यात आज दसरा असल्यामुळे राज्यभर उत्सावाची धूम पाहायला मिळते. करोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वच ठिकाणी साध्या पद्धतीने सण साजरे केले जात आहेत. पण आजच्या दसऱ्याच्या या शुभ दिनी परभणीमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी घटना समोर आली आहे.

ऐन दसऱ्याच्या दिवशी पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात दोघांनी घरा शेजारी असलेल्या बारवात उडी मारली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नीला बचावण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. ही घटना पाथरी शहरातील फकराबाद भागात घडली आहे.
प्रदुषण नाही थांबलं तर मुंबईसह ५० शहरं पाण्याखाली जाणार, सगळ्यांनाच अलर्ट करणारा अहवाल
अधिक माहितीनुसार, या घटनेत पती संजय उबाळे (३२) याचा मृत्यू झाला तर पत्नी सुमन उबाळे (२८) चा जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. पती -पत्नी दोघांनी सोबतच बारवात उड्या मारल्या होत्या. बारवा शेजारी असलेल्या काही युवकांनी दोघांना वाचवण्यासाठी बारवात उड्या मारल्या. मात्र, महिलेला वाचवण्यात युवकांना यश आले. दुर्दैवाने या घटनेत पतीचा मृत्यू झाला आहे.

ऐन दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासारखी बातमी; लोकल प्रवास झाला आणखी सोपा

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here