मुंबई: मुंबईची भाषा हिंदी असल्याचं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत दाखवल्यानं वाद निर्माण झाल्यानंतर मालिकेतील अभिनेता अमित भट्ट यानं जाहीर माफी मागितली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला होता.

दिवसभर हा मुद्दा चांगलाच गाजला. अनेक मनसेच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चंपकचाचाची भूमिका साकारत असलेला अभिनेता अमित भट्ट यानं जाहीर माफी मागितली आहे. एका पत्रकाद्वारे अमितनं माफी मागितली आहे.’ मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो. मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारत आहे. अभिनय करत असताना लेखकानं दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असं माझ्याकडून चुकून बोललं गेलं आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापुढं अशी चूक होणार नाही याची मी दखल घेईन. वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल की विनंती’, असं अमितनं त्याच्या माफीनाम्यात लिहिलं आहे.

वाचा:

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ निर्माते असित मोदी यांनी देखील या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. मोदी यांनी ट्विट करत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे यात काही वादच नाही…मी भारतीय आहे. महाराष्ट्रीयन आहे, गुजराती पण आहे… सर्व भाषांचा मी आदर करतो… जय हिंद’, असं ट्विट करून असित मोदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच मोदी यांनी आणखी एक ट्विट करत सर्व भाषा आपल्या राष्ट्रभाषा आहेत, प्रत्येक भारतीय भाषेचा आदर आणि सन्मान व्हायला हवा. आपण सर्व भारतीय आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:

काय आहे वाद?गोकुलधाम सोसायटीमधील प्रत्येक सदस्य हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार अशी शपथ घेतो. त्यानंतर .विसंवादामध्ये बापूजी मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतात. असा प्रसंग दाखवताना बापूजींच्या संवादामुळं वाद निर्माण झाला. ‘हमारा गोकुलधाम मुंबई में हैं, और मुंबईकी आम भाषा क्या है? हिंदी… इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है, अगप हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो तामिळ मे लिखते,’ अशा प्रकारचा संवाद मालिकेत दाखण्यात आला

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here