नवी दिल्लीः यांचं पंजाब काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवण्यात आलं आहे. सिद्धू यांनी आज दिल्लीत राहुल गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर सिद्धू यांनी हा निर्णय घेतला आहे. “ज्या काही तक्रारी होत्या, त्या आपण राहुल गांधींना कळवल्या आहेत. त्या सर्व सोडवण्यात आल्या आहेत, असं सिद्धू म्हणाले. राजीनामा मागे घेतला का? असा प्रश्न सिद्धूंना विचारण्यात आला. जे काही करतोय, ते सर्व तुमच्यासमोर आहे, असं उत्तर सिद्धूंनी दिलं.
यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. सिद्धूंनी राहुल गांधींना आपल्या चिंता सांगितल्या. राजीनामा मागे घेतील, असं सिद्धू यांनी राहुल गांधींना आश्वासन दिले आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते पुन्हा काम सुरू करतील, असं हरीश रावत म्हणाले.
सिद्धू यांनी गुरुवारी काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि हरीश रावत यांची भेट घेतली होती. यादरम्यान, आपण का राजीनामा दिला? याची माहिती त्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिली.
सिद्धू यांनी २८ सप्टेंबरला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सिद्धू यांची काँग्रेस नेतृत्वासोबत झालेली ही पहिली बैठक आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times