हायलाइट्स:

  • सीआरपीएफचे सहा जवान जखमी
  • एका जवानाची प्रकृती चिंताजनक
  • डेटोनेटर बॉक्समध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या एका रेल्वेत अचानक स्फोट झाल्यानं अचानक खळबळ उडाली. या स्फोटात सीआरपीएफचे सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.

शिफ्टिंग दरम्यान काडतुसाच्या पेटीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. ही घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजल्या दरम्यान घडली.

स्फोटानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. जखमींना उपचारासाटी पाठवण्यात आल्यानंतर रेल्वे सकाळी ७.१५ मिनिटांनी पुढे रवाना करण्यात आली. या स्फोटात कोणत्याही सामान्य नागरिकाला नुकसान झालेलं नाही.

pulwama encounter : पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, PSI अर्शीद यांच्या मारेकऱ्यांना कंठस्नानsinghu border incident : सिंघू सीमेवरील हत्येची जबाबदारी निहंग सरबजीत सिंगने स्वीकराली, पोलिसांना शरण
मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या २११ व्या बटालियनचे जवान विशेष रेल्वेनं जम्मूला जात होते. रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभी होती. त्याच दरम्यान हा स्फोट झाला. सीआरपीएफनं दिलेल्या माहितीनुसार, डेटोनेटर बॉक्स फुटल्यानं हा अपघात झाला.

जखमी झालेल्या जवानांपैंकी हवालदार विकास चौहान यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमी जवानांत चवन विकास लक्ष्मण, रमेश लाल, रविंद्र कर, सुशील, दिनेश कुमार पॅकरा यांचा समावेश आहे. सीआरपीएफचे उच्च अधिकारी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

chhattisgarh : जशपूरमध्ये कारने अनेकांना चिरडले, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया…
car rammed in jashpur chhattisgarh : भयंकर! छत्तीसगडमध्ये लखीमपूर पॅटर्न? कारने अनेकांना चिरडलं; ४ जण ठार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here