लंडन: ब्रिटनमधील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अॅमेस यांची शुक्रवारी चाकू भोसकून हत्या करण्यात आली. पूर्व इंग्लंडमधील एका चर्चमध्ये मतदारांसोबतच्या सभेवेळी हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एका २५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणाची चौकशी दहशतवादविरोधी विभागाकडे सोपवण्यात आली आहे.

लीघ-ऑन-सी येथे चाकूहल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली व चाकू हस्तगत करण्यात आला, असे एस्सेक्स पोलिस दलाने म्हटले आहे. स्काय न्यूज व अन्य प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पूर्व लंडनमधील लीघ-ऑन-सी या समुद्रकिनारी असलेल्या शहरात बेल्फेअर्स मेथोडिस्ट चर्चमधील अॅमेस यांच्या मतदारांसोबतच्या नियमित सभेवेळी हा हल्ला करण्यात आला.

धनुष्य बाणाने केलेल्या हल्ल्यात पाच जण ठार; नॉर्वेतील धक्कादायक घटना
६९ वर्षीय अॅमेस हे १९९७पासून संसदेचे सदस्य होते. मात्र १९८३ला ते खासदार झाले. त्याचा जनसंपर्क दांडगा होता. साऊथएंडला शहर घोषित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. राजकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

बलात्कार, हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात काढली ३७ वर्षे; डीएनए चाचणीमुळे ठरला निर्दोष!
ब्रिटनमध्ये याआधीदेखील खासदारांची चाकूनो भोसकून हत्या करण्यात आली. याआधी सन २०१६ मध्ये मजूर पक्षाचे खासदार जो कॉक्स यांचीदेखील चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याआधी सन २०१० आणि २००० मध्ये खासदारांवर हल्ले झाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here