हायलाइट्स:

  • मोदी सरकार आत्तापर्यंतचं सर्वात ‘लोभी’ सरकार : पी चिदंबरम
  • इंधनांच्या किंमतीवरून केंद्र सरकारवर निशाणा
  • ‘पेट्रोलच्या किंमतीच्या एक तृतियांश भाग हा केंद्र सरकारचा कर’

नवी दिल्ली : देशात इंधनांच्या वाढलेल्या किंमतींवरून माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर वसुलीचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आत्तापर्यंतचं सर्वात ‘लोभी सरकार’ असल्याची टीकाही पी चिदंबरम यांनी केलीय.

‘करांच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर ग्राहकांच्या खिशातून केंद्र सरकार जबरदस्तीनं वसुली करत आहे’, अशा शब्दांत चिदंबरम यांन केंद्रावर हल्ला केलाय.ते ‘एनडीटीव्ही’शी बोलत होते.

पेट्रोलच्या किंमतीच्या एक तृतियांश भाग हा केंद्र सरकारचा कर आहे. एखाद्या वस्तूवर ३३ टक्के कर लादणं ही जबरदस्तीनं वसुली करण्यासारखंच आहे, असं माजी अर्थमंत्र्यांनी म्हटलंय.

Sonia Gandhi: माझ्याशी मीडियाच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही, सोनियांनी ‘जी २३’ला सुनावलं
Manmohan Singh: माजी पंतप्रधानांच्या भेटीचा ‘किळसवाणा पीआर स्टंट’, काँग्रेसची आरोग्यमंत्र्यांवर टीका
यावेळी, चिदंबरम यांनी पेट्रोलच्या किंमती आणि करांबद्दलही स्पष्टीकरण दिलंय. पेट्रोलसाठी जेव्हा ग्राहक १०२ रुपये प्रती लीटर मोजत असतात तेव्हा यामध्ये ४२ रुपये तेल कंपन्यांकडे जातात. यात कच्च्या तेलावरच्या प्रक्रियेचाही समावेश आहेत. ३३ रुपये केंद्र सरकारकडे आणि २४ रुपये राज्य सरकारकडे कराच्या स्वरुपात जातात. तर ४ रुपये डिलरकडे जातात. म्हणजे, पेट्रोलच्या किंमतीवर जवळपास ३३ टक्के वसुली केंद्र सरकारकडून केली जाते, असं त्यांनी म्हटलंय.

Madhya Pradesh: भाचीला कन्यारत्न, पेट्रोल पंप मालकाची ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर
Chhattisgarh: रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट, सीआरपीएफचे सहा जवान गंभीर जखमी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here