हायलाइट्स:

  • मृताच्या शरीरावर ३७ जखमांचे निशाण
  • अत्यंत निर्घृणपणे सिंघु सीमेवर लखबीर सिंहची हत्या
  • मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी, इतरांचा शोध सुरू

नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी सिंघु सीमेवर अत्यंत निर्घृणपणे एका व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीत यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी, न्यायालयानं आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी सकाळी हात – पाय तोडलेल्या अवस्थेतील अवस्थेत एका व्यक्तीला रस्त्यावरच्या बॅरिकेडला बांधून ठेवल्याचं समोर आलं होतं. रक्तबंबाळ आणि अर्धनग्न अवस्थेत या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या व्यक्तीचं नाव लखबीर सिंग असल्याचं समोर आलं होतं. शीखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिबचा अपमान केल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात आल्याचं निहंग शीख म्हणत असल्याचं एका व्हायरल व्हिडिओतून समोर आलं होतं. कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळाजवळच ही घटना घडलीय.

singhu border incident : सिंघू सीमेवरील हत्येची जबाबदारी निहंग सरबजीत सिंगने स्वीकराली, पोलिसांना शरणmurder at singhu border : सिंघू सीमेवरील निर्घृण हत्येशी आमचा काहीही संबंध नाही, संयुक्त किसान मोर्चाचा दावा
सिंघू सीमेवर जमावाकडून हत्या : कोण होता लखबीर सिंह? जाणून घ्या…
हत्येतील मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीत सिंग स्वत:हून शुक्रवारी सायंकाळी उशिरा लखबीरच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिसांसमोर हजर झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आज (शनिवारी) सोनीपत पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी, न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हरयाणा पोलिसांनी सरबजीत सिंहच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. हत्याकांडात वापरण्यात आलेल्या हत्यारांच्या तपासासाठी पोलिसांनी ही वेळ मागितली होती. परंतु, न्यायालयानं आरोपीला सात दिवसांची कोठडी सुनावलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सरबजीत सिंहनं चौकशीत आणखीन चार आरोपींची माहिती दिलीय. लवकरच या आरोपींनाही ताब्यात घेण्यात येईल.

दरम्यान, मृत लखबीर सिंह याचा शवविच्छेदन अहवालही पोलिसांना मिळालाय. यात मृताच्या शरीरावर ३७ जखमांचे निशाण आढळल्याचं म्हटलं गेलंय. हल्ल्यासाठी काठ्यांसहीत अनेक हत्यारांचा वापर करण्यात आल्याचंही यात म्हटलं गेलंय. शनिवारी सकाळी लखबीर याची बहिण राज कौर हिनं त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तरणतारनकडे रवाना झाली.

Uttar Pradesh: राम वियोगात ‘राजा दहशरथा’नं मंचावरच सोडले प्राण! पण ‘तो’ अभिनय नव्हता
P Chidambaram: ‘पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर ३३ टक्क्यांची वसुली’
Manmohan Singh: माजी पंतप्रधानांच्या भेटीचा ‘किळसवाणा पीआर स्टंट’, काँग्रेसची आरोग्यमंत्र्यांवर टीका

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here