जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यांनीही नागरिकांना निर्धास्त राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज आहेत. राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. ‘करोना’च्या संशयितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दहा खाटा स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाग्रस्तांवर उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे,’ अशी माहितीही टोपे यांनी दिली.
वाचा:
मुंबई महापालिका सज्ज
करोना व्हायरसच्या संभाव्य संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीनं तयारी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी उद्या विशेष बैठक बोलावली आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी, प्रत्येक प्रभागाचे अधिकारी, महापालिका रुग्णालयांचे अधिष्ठाता, खासगी रुग्णालयातील अधिकारी यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘करोना’ची तयारी आणि उपाययोजना यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
दिल्लीत करोनाचा शिरकाव
दिल्लीत करोना व्हायरस घुसल्याचं समोर आल्यनंतर जवळपास ७० जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. नोएडातल्या अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्यात. नोएडामध्ये ६ संशयित लोकांचे सॅम्पल घेण्यात आले होते. परंतु, त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. परंतु या सर्वांना पुढचे १४ दिवस विशेष देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. लक्षणं विकसित होताना दिसली तर त्यांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येईल.
वाचा:
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times