मुंबई: बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहणारी जोडी म्हटले की, पहिले नाव येते अभिनेता आणि अभिनेत्री यांचे. या दोघांनी लग्न करण्याअगोदर बराच काळ एकमेकांना डेट केले. सैफने दोन-तीनवेळा करिनाला लग्नासाठी प्रपोज केले होते, मात्र तुम्हाला हे ठाऊक आहे का की, त्यांच्या प्रेमाची सुरुवात एका सूपच्या बाऊलपासून झाली होती?

सूपचे बाऊल अन् बदलले आयुष्य

ही लव्हस्टोरी वाचण्यापूर्वी करिनाच्या सुंदर पोस्टवर एक नजर टाका, जी तिने तिच्या लग्नाच्या नवव्या वाढदिवसानिमित्त शेअर केली आहे. करिनाने सैफला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ग्रीसमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही रोमॅंटीक पोझ देताना दिसत आहेत आणि समोर सूपचा एक बाऊल ठेवलेला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘कोणे एकेकाळची गोष्ट आहे, त्यावेळी आम्ही ग्रीसमध्ये होतो. समोर सूपचा बाऊल होता आणि आम्ही होतो. त्याने माझे आयुष्य कायमचे बदलून टाकले. आयुष्यातील सर्वात हॅंडसम व्यक्तीला हॅपी वेडिंग ऐनिवर्सरी.’

टशनच्या सेटवर झाले होते प्रेम
सैफ व करिना ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी चित्रपटाची शुटींग ग्रीसमध्ये सुरू होती आणि त्याचवेळी सैफ अली खानने करिनाला लग्नासाठी विचारले होते. करिनाने एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘सैफने तिला प्रपोज करताना म्हटले होते, मला वाटते की, आपण लग्न करायला हवे.’ करिनाने सांगितल्यानुसार, सैफने ही गोष्ट तिला लडाखमध्ये देखील म्हटली होती. मात्र त्यावेळी करिनाला असे वाटत होते की, ती सैफला चांगल्याप्रकारे ओळखत नाही. तिला त्याच्यासोबत आणखी वेळ घालवून त्याला जाणून घ्यायचे आहे.

शुटिंगवरून गुपचूप जायचे बाईक राइडवर

करिनाच्या सांगण्यानुसार ‘टशन’ चित्रपटाच्यावेळी ती सैफच्या प्रेमात अडकत चालली होती. तिला सैफ खूपच गोड आणि काळजी घेणारा वाटू लागला होता. करिनाने सांगितले की, लडाख व जैसलमेरमध्ये जेव्हा सिनेमाचे शूट सुरू होते, तेव्हा ते दोघे वेळ काढून बाईक राइडला जायचे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here