मुंबई: रेल्वे रूळ ओलांडताना लोकलची धडक लागून जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे सतर्क मोटरमन आणि गार्डनं प्राण वाचवले. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकात काल, मंगळवारी हा अपघात झाला होता. जखमी महिलेवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तिची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली.

मार्गावरील शिवडी स्थानकाजवळ काल, मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडताना सुमन खवले या ६० वर्षीय महिलेला पनवेल लोकलची धडक लागली. या धडकेत त्या जखमी झाल्या. त्याचवेळी प्रसंगावधान राखून मोटरमन आर. बी. राऊळ आणि गार्ड बी. एस. गुर्जर यांनी लोकलचे इमर्जन्सी ब्रेक दाबले. त्यामुळं त्यांचा जीव वाचू शकला. मोटरमन आणि गार्डनं लोकलमधील प्रवाशांच्या मदतीनं जखमी महिलेला ट्रेनमध्ये बसवले आणि त्यानंतर त्यांना शिवडी स्थानकात नेले. तेथील रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीनं सायन हॉस्पिटलमध्ये नेले. सुमन खवले यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठीक आहे. खवले यांचे प्राण वाचवणाऱ्या मोटरमन आणि गार्डचे रेल्वे प्रशासनानं कौतुक केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here