हायलाइट्स:

  • आर्यन खान प्रकरणी फरदीन खानच्या वकीलाने केले भाष्य
  • फरदीनला जामीन मिळवण्यासाठी असा केला युक्तीवाद
  • आर्यन खान प्रकरणात या गोष्टींकडे झाले दुर्लक्ष

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज पार्टीमधून अटक करण्यात आली असून सध्या त्याचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात आहेत. त्याच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी २० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणावर ड्रग्ज प्रकरणात अडकलेला फरदीन खान आणि भारती सिंग यांचे वकील अयाज खान यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. अयाज यांनी सांगितले की, या दोघांची केस त्यांनी कशा पद्धतीने हाताळली होती आणि त्यांनी या दोघांना कसा जामीन मिळवून दिला होता.

क्रुझवर जाण्याआधी आर्यन खाननं अरबाज केलेला ‘लेट्स हॅव अ ब्लास्ट’चा मेसेज

याबरोबरच अयाज खान यांनी सांगितले की, आर्यन खान प्रकरणामध्ये कुठे समस्या निर्माण झाली आणि कोणत्या मुद्द्यावर त्यांना उशीर झाला. अयाज यांनी फरदीन आणि भारतीच्या खटल्याची तुलना आर्यनच्या खटल्याची करत तो कसा हाताळायला हवा होता याबाबत त्यांचे मत नोंदवले.

आर्यन खान

कोकेन खरेदी करताना पकडला गेला होता फरदीन

फरदीन खानला २००१ मध्ये ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने जुहू येथून अटक केली होती. आर्यन खान प्रकरणावर मत व्यक्त करताना अयाज खान यांनी ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकरणाचा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा मला फरदीन खान प्रकरण सांगण्यात आले. तेव्हा मी प्रकरणातील सत्य काय आहे जाणून घेतले. सरकारी पक्षाने सांगितल्यानुसार फरदीनला एक ग्रॅम कोकेन विकत घेताना नासिर शेख नावाच्या पेडलसोबत अटक करण्यात आली. परंतु त्या नासिर शेखकडे कोकेनचे प्रमाण अधिक होते. फरदीनने एक ग्रॅम कोकेन विकत घेण्यासाठी एटीएममधून ३ हजार ५०० रुपये काढले होते. परंतु कार्ड मशीनमध्ये अडकल्याने त्याला पैसे काढता आले नाही.’

आर्यन खानला पाठिंबा देण्यासाठी हंसल मेहता म्हणाले,’मारिजुआनाचं सेवनच कायदेशीर करा’

फरदीनच्या जामीनासाठी केली अशी तयारी

अयाज यांनी सांगितले की हा तोच मुद्दा होता की त्यावर त्यांना काम करण्याची गरज असल्याचे लक्षात आले. त्यांनी पुढे सांगितले की, ‘फरदीनच्या वडिलांनी फिरोज खान यांनी मला आवर्जून सांगितले होते की, या प्रकरणात कोणताही खोटेपणा करायचा नाही. त्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने बचावासाठी प्रयत्न सुरू केले. फरदीनकडे एक ग्रॅम कोकेन सापडण हा गुन्हा जामीनपात्र आहे. एक ग्रॅम कोकेन फार मोठा साठा नाही. त्यामुळे त्याला यासाठी सहा महिने अथवा १० हजारांचा दंड होऊ शकतो. हा लहान गुन्हा आहे आणि त्यावेळी दोन ग्रॅम ही मात्र कमी असल्याची अधिसूचना आली होती. त्यावर आम्ही जास्त काम केले. फरदीनच्या युक्तीवादावेळी हाच मुद्दा ठळकपणे मांडला.’

आर्यन खान

आर्यन खान प्रकरणात काय झाली चूक

आर्यन खान प्रकरणामध्ये नेमकी कुठे चूक झाली याबाबत अयाज खान यांनी सांगितले की, ‘आर्यन खान प्रकरणात एक समस्या आहे की एनसीबीने आता तपास करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला आर्यनच्या विरोधात ड्रग्ज घेणारा म्हणून गुन्हा नोंदवला होता. त्यांनी आर्यनच्या विरोधात कलम २७,२८ आणि २९ लावले. कलम २७ हे ड्रग्जचा उपभोग घेणाऱ्याविरोधात, कलम २८ हे ड्रग्जचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याच्या विरोधात आणि कलम २९ हे ड्रग्जचा उपभोग घेण्यासाठी आखलेल्या कटात सहभागी होण्यासाठी आहे. परंतु या कलमांनुसार शिक्षा केवळ ड्रग्जचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच होऊ शकते. ड्रग्जचा उपभोग घेण्यासाठी कलम २८ आणि २९ मध्ये शिक्षा नाही. एनसीबीला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी आर्यनचे व्हॉट्सअॅप चॅट शोधले आणि बाकीच्या गोष्टी समोर आल्या. मला असे वाटते की याप्रकरणात देखील साक्षीदार होते.’

शाळेच्या फुटबॉल टीमचा कर्णधार होता आर्यन खान, सामना हरल्यानंतर ढसाढसा रडलेला

आर्यन ताब्यात असल्याने एनसीबीला संधी मिळाली

अयाज खान यांनी पुढे सांगितले की, ‘ याप्रकरणी आर्यनला सहा दिवस एनसीबीच्या कोठडीत ठेवल्यामुळे एनसीबीला तपास सुरू ठेवण्याची संधी मिळाली. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांना बराच वेळ मिळाला. त्यामुळेच त्यांनी न्यायालयात आर्यन परदेशात होता तेव्हा काही पेडलर्सच्या संपर्कात होता असे सांगितले. आता आर्यनने काय जबाब नोंदवला आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहे किंवा एनसीबीने आर्यनकडून काय जबाब नोंदवून घेतला आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत.’

फरदीन खान आणि आर्यन खान केसची तुलना

अयाज खान यांनी या मुलाखतीमध्ये फरदीन आणि आर्यन यांच्या खटल्याची तुलना केली. त्यांनी सांगितले की, जेव्हा पहिल्या दिवशी फरदीनला न्यायालयात सादर केले तेव्हाच मी जामीनासाठी अर्ज केला होता. जे आर्यनच्या प्रकरणात झाले नाही. आम्ही जेव्हा जामीन अर्ज सादर केला आणि दुसऱ्या दिवशी सुनावणीसाठी न्यायालयात आली. एनसीबीने त्यांचे उत्तर दाखल केले तेव्हा त्यावर आम्ही योग्य तो युक्तीवाद केला आणि फरदीनला जामीन मिळून तो बाहेर आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here