हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडून किरीट सोमय्या यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
  • सोलापुरातील होटगी रोडवर आंदोलन
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पाहताच सोमय्या यांनी लपवला चेहरा

सोलापूर : कोल्हापूरपाठोपाठ सोलापुरातही भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे. आज सोलापूरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचा वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय. सोलापुरातील होटगी रोडवर हे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व अन्य महाविकास आघाडीतील सत्ताधारी मंत्र्यांवर सोमय्या यांच्याकडून सातत्याने आरोप होत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणांचा वापर राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या विरोधात जवाब दो, जवाब दो, किरीट सोमय्या जवाब दो..! माफी नामा द्या, माफी नामा द्या, किरीट सोमय्या माफी नामा द्या..! अश्या प्रकारे घोषणा देण्यांत आल्या.

Breaking : नांदेड निवडणुकांच्या आधीच भाजपला मोठं खिंडार, बड्या नेत्याची राजीनामा देत काँग्रेस प्रवेशाची घोषणा
या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पाहताच सोमय्या यांनी आपला चेहरा लपवला. तेव्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अभिजित पाटील, अमोगी तेलंग, सुरज मिरगे, नागेश कांबळे, प्रतीक हणमगाव या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा केली. यापूर्वीही पवारांविरुद्ध बेताल वक्तव्य केल्याचा निषेध म्हणून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच सोलापूरात फोडण्यात आली होती. त्यानंतर आता सोमय्या यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

राज्यात कांदा पुन्हा रडवणार, दिवाळीपर्यंत भाव वाढणार; वाचा काय असेल नवा दर?

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here