हायलाइट्स:

  • एनसीबीतर्फे आर्यन खानचे झाले समुपदेशन
  • मी चांगला व्यक्ती बनणार असल्याचे आर्यने केले स्पष्ट
  • गरिबांना मदत करण्याचे दिले समीर वानखेडेंना वचन

मुंबई: प्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात बंदिस्त आहे. आर्यन खानबद्दल असे सांगितले जाते की, जेव्हा तो नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ताब्यात होता, त्यावेळी एनसीबीतर्फे त्याचे समुपदेशन करण्यात आले होते. एका वृत्तानुसार, आर्यन खानने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना वचन दिले होते की, तो चांगले काम करेल आणि एक दिवस त्यांना त्याचा अभिमान वाटेल.

देवा धर्माला लागले! गौरी खानने मुलगा आर्यनसाठी मागितली ‘मन्नत’

वृत्तामध्ये पुढे सांगण्यात आले की, आर्यनने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना हेदेखील वचन दिले की, तो कारागृहातून बाहेर पडल्यानंतर एक चांगला माणूस होईल, तसेच आर्थिकरित्या कमकुवत लोकांची मदत करेल. असे म्हटले जाते की, आर्यनचे समीर वानखेडे यांच्यासह एनसीओच्या वर्कर्सकडूनही समुपदेशन करण्यात आले होते.

आर्यन खान

२ ऑक्टोबर रोजी रात्री एका क्रूझमधील रेव्ह पार्टीवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती. त्यामधूनच आर्यन खानसह अन्य सात व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आर्यन खानसह सर्वांनाच एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले. स्थानिक न्यायालयाने सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या आर्यन खानला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे.

आर्यन खान केसमध्ये भारी पडली चूक, वाचा सतीश मानेशिंदेंची चूक

मुंबई सेशन कोर्टाने गेल्या १४ ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामिन अर्जावरील निर्णय राखून ठेवला. आता कोर्ट २० ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामिनावर पुन्हा एकदा निर्णय सुनावेल. कोर्टाला १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान सुट्टी असल्यामुळे हायकोर्ट आणि अन्य स्थानिक कोर्ट पाच दिवस बंद आहेत. त्यामुळे आर्यन खानला त्याच्या जामिनासाठी किमान २० ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here