हायलाइट्स:
- हॉटेल मालकाचा तलवारीने सपासप वार करून खून
- संशयितांच्या घरावर, दुकानावर दगडफेक
- पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला
याबाबत अधिक माहिती अशी की, इचलकरंजी येथील स्टेशन रोडवर संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव यांचे जमसम नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमधील कामगारांचा आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम काणे यांचा वाद होता. गणेशोत्सव काळात त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. मारामारीही झाली होती. या वादातून काणे याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते.
हा राग मनात धरून शनिवारी उशिरा काणे याच्यासह अन्य काही तरुणांनी हॉटेल मालक जाधव यांच्यावर जोरदार हल्ला केला. तलवारींसह विविध धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यांना उपचाराला दवाखान्यात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कळताच संशयित आरोपींच्या घरावर काहींनी दगडफेक केली. दुकानांची जाळपोळ केली. यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण झालं असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसंच काणे याच्यासह सहा संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times