द्वारा लेखक | महाराष्ट्र टाइम्स | अद्यतनित: 18 ऑक्टोबर, 2021, 7:46 AM

करोना रुग्णसंख्येमध्ये थोडी वाढ दिसत असतानाच १९ वर्षांपर्यंतच्या मुलांचीही विशेष काळजी घेण्याची गरज समोर येत आहे. मुंबईमध्ये एक ते एकोणीस या वयोगटातील पन्नास हजार मुलांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

प्रतिनिधी फोटो
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना रुग्णसंख्येमध्ये थोडी वाढ दिसत असतानाच १९ वर्षांपर्यंतच्या मुलांचीही विशेष काळजी घेण्याची गरज समोर येत आहे. मुंबईमध्ये एक ते एकोणीस या वयोगटातील पन्नास हजार मुलांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. आजही करोना संसर्गाची सर्वाधिक रुग्णसंख्या ही ३० ते ३९ या वयोगटामध्ये दिसत असून, अशा बाधितांची संख्या १ लाख ४६ हजार ८६५ आहे. तर ४० ते ४९ या वयोगटामध्ये ती १ लाख ३२ हजार ४४५ इतकी नोंदवण्यात आली आहे.

करोना संसर्गाची तिसरी लाट आल्यास त्यात मुलांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी सातत्याने व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने पालिकेने नियोजनही केले आहे. मात्र, या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने मोठी वाढ होत नसून, एक ते एकोणीस या वयोगटातील रुग्णसंख्येमध्ये चढउतार दिसून येत आहेत. त्यात झपाट्याने वाढ होत नसल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जम्बो सेंटरची तयारी, ऑक्सिजनची उपलब्धता, संसर्गित मुलांसोबत पालकांनाही राहता यावे यासाठी करण्यात आलेली सुविधा, औषधांची उपलब्धता अशा सर्व पातळ्यांवर पालिकेने तयारी केली आहे. करोना रुग्णसंख्या रोज कशाप्रकारे वाढते, संसर्गाचा फैलाव कोणत्या भागामध्ये अधिक आहे याचा अभ्यासही सातत्याने करण्यात येत आहे. ‘दुसरी लाट आली तेव्हा ३० ते ४० या वयोगटामध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक होता. आजही या वयोगटामध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक दिसते. कारण हा गट नोकरी-कामाच्या निमित्ताने बाहेर पडणारा, प्रवास करणारा आहे’, याकडे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. अय्यर यांनी लक्ष वेधले.

मुलांमध्ये संसर्ग अधिक

करोना संसर्गाचे प्रमाण मुलींच्या तुलनेमध्ये मुलांमध्ये अधिक असल्याचे दिसते. शून्य ते नऊ या वयोगटामधील ५५ टक्के मुले तर १० ते १९ वयोगटामधील ५६ टक्के मुलांना संसर्ग झाला आहे. २० ते २९ वयोगटामध्ये तरुणांमधील प्रमाण ६० टक्के इतके आहे. तर ३० ते ३९ या वयोगटामध्येही ६३ टक्के पुरुषांमध्ये करोनाचा संसर्ग झालेला दिसून येतो. २० ते २९ या वयोगटामध्ये १ लाख १६ हजार ३५२ जणांना मुंबईमध्ये करोना संसर्गाची लागण झाल्याचे दिसून येते.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: 19 वर्षांपर्यंतच्या 50,000 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here