हायलाइट्स:

  • ‘प्रामाणिकपणा आहे म्हणून जग आहे’
  • चपला-जोडे शिवणाऱ्याचा प्रामाणिकपणा आपल्यालाही लाजवेल
  • फाटलेली बॅग शिवताना साडलेलं पाकिट उघडलं अन्….

बुलडाणा : म्हणतात ना ‘प्रामाणिकपणा आहे म्हणून जग आहे’ हाच प्रामाणिकपणा दाखवणारे अनेकदा दिसून येतात. असाच प्रामाणिकपणा बुलडाण्यातील चपला-जोडे शिवणाऱ्याने दाखवून दिला आहे, त्याच्याकडे शिवण्यासाठी आलेल्या जुन्या बॅगेत राहिलेले ४४ हजार रुपये त्याने ग्राहकाला बुलडाणा शहर ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या समक्ष परत दिले. चपला-जोडे शिवणाऱ्या या प्रामाणिक व्यक्तीचं नाव वसंता किशन शेळके आहे.

दसरा व दिवाळी सणानिमित्त घराची साफ-सफाई करीत असतांना घरातील जुने बॅग मुकेश जयस्वाल व त्यांच्या पत्नी पूर्वा जयस्वाल या दोघांनी बुलडाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयजवळील भोंडे चौकात चपला-जोडे व बॅग शिवणाऱ्या वसंता शेळके यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी जुने ७ बॅग १२० रुपयांची मजुरी ठरवून शिवण्यासाठी दिले. फाटलेले बॅग शिवता-शिवता एका बॅगमध्ये वसंता शेळके यांना एक लेडीज पाकीट दिसले. त्या पाकिटला उघडून पाहिले तर त्यात २ हजाराच्या २२ नोटा म्हणजे ४४ हजार रुपये होते. काही वेळेनंतर जयस्वाल दाम्पत्य बॅग घेण्यासाठी परत न आल्यामुळे व त्यांच्या संपर्क नंबर नसल्यामुळे अनंता शेळके सदर बॅग व पैश्याची पाकीट बुलडाणा शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्याकडे सोपवण्याचे ठरविले. ठाणेदारांना संपर्क करून ते पैसे व बॅग त्यांच्या स्वाधीन केले.

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, लष्करी अधिकारी अटकेत
दसऱ्याच्या दिवशी प्रामाणिकपणा दाखविल्याने ठाणेदार साळुंखे यांनी वसंता शेळके यांचे तोड गोड केले. नंतर शनिवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जयस्वाल दाम्पत्य बॅग घेण्यासाठी वसंता शेळके यांच्याकडे पोहचले. जयस्वाल दाम्पत्यांना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात नेवून ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या व वसंता शेळके यांच्याहस्ते ४४ हजार व बॅग परत दिले. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थीत होते. सगळ्यांनी यावेळी वसंता शेळकेंचे कौतुक केले.

प्रामाणिकपणाने पैसे परत दिल्याने जयस्वाल दाम्पत्यांनी वसंता शेळके यांना सगळ्यांच्या समक्ष दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले. यावेळी मात्र आपल्या मजुरीचे राहिलेले १२० रुपये मागण्याचे शेळके विसरले नाही आणि त्यांनी १२० रुपये सगळ्यासमक्ष मागितले आणि सगळ्यांना यावेळी हसू आवरता आले नाही.

यंदा निर्बंधमुक्त दिवाळी?; टास्क फोर्सबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here