हायलाइट्स:
- भारतीय हद्दीत नेपाळी विमान
- बिहारच्या महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली भागातील घटना
- विमानाचं नेपाळच्या भैरहवा गौतम बुद्ध विमानतळावर लँडिंग
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या भैरहवा गौतम बुद्ध विमानतळावर लँडिंग दरम्यान इथलं एक विमान भारतीय सीमेत जवळपास ४०० मीटर आत घुसलं होतं. ही घटना शुक्रवारी दुपारी १.०० वाजल्याच्या सुमारास घडली.
भैरहवा स्टेशनचे सुपरिटेन्डन्ट दर्शन धीमरे यांच्या म्हणण्यानुसार, खराब हवामान आणि लँडिंग सिग्नल न मिळाल्यानं अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. उत्तर दिशेनं हवामान बिघडलेलं असेल तेव्हा विमानाला लँडिंगसाठी दक्षिणेकडून यावं लागतं. विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी भारतीय सीमेत जावं लागतं.
तर नेपाळ विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भैरहवा विमानतळावर विमाला सुरक्षित लँडिंगसाठी जवळपास ४ किलोमीटरच्या अंतराची गरज पडते. दक्षिण दिशेत केवळ ३ किलोमीटर अंतरावर भारताची हद्द सुरू होते. अशावेळी पर्याय नसल्यानं विमानाला भारतीय सीमेत प्रवेश करावा लागतो. विमानाचा पायलट गोरखपूर, वारणसी विमानाच्या एअर ट्राफिक कंट्रोलकडून परवानगी घेऊन भारतीय हद्दीत उड्डाण करतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times