मॉस्को: अवकाशामध्ये विविध प्रयोग करीत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर नुकतेच एका चित्रपटाचे चित्रीकरणही रंगले. काही मिनिटांच्या चित्रीकरणासाठी सुमारे बारा दिवसांचा कालावधी अवकाश स्थानकावर व्यतीत करून दोन रशियन कलाकार रविवारी परतले. या दोन कलाकारांबरोबरच एका अंतराळवीराला घेऊन येणारे सोयुज यान साडेतीन तासांच्या प्रवासानंतर कझाकस्तानातील केंद्रावर परतले.

ओलेज नोवितस्की, युलिया पेरेसिल्ड आणि क्लिम शिपेंको अशी रविवारी परतलेल्या तीन व्यक्तींची नावे आहेत. यातील पेरेसिल्ड या चित्रपडातील अभिनेत्री आहे, तर शिपेंको हे दिग्दर्शक आहे. नोवितस्की सहा महिन्यांपासून अवकाश स्थानकामध्ये होते. चित्रीकरण करण्यात आलेल्या चित्रपटाचे नाव ‘चॅलेंज’ असे आहे.

रशियाच्या हद्दीत अमेरिकी बॉम्बर; रशियाने पाठवले मिग-३१ लढाऊ विमाने

bride wore 60 kg gold : लग्नात नवरीने घातले ६० किलो सोन्याचे दागिने! फोटो व्हायरल

यामध्ये अवकाश स्थानकावरील आजारी अंतराळवीराच्या उपचारांसाठी धावून गेलेल्या एका सर्जनची कथा दाखवण्यात आली आहे. यासाठी पेरेसिल्ड आणि शिपेंको पाच ऑक्टोबर रोजी अवकाश स्थानकावर पोहोचले होते. ‘सुरुवातीला बारा दिवस हा खूप मोठा कालावधी आहे, असे मला वाटत होते; मात्र चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर, मला परत यावेसे वाटत नव्हते,’ अशी प्रतिक्रिया पेरेसिल्डने दिली. या चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण रशिया व अन्यत्र होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here