हायलाइट्स:
- सोमवारी पहाटे पॅकेजिंग युनिटला भीषण आग
- तब्बल १२४ हून अधिक जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं
- अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी हायड्रोलिक क्रेनचा वापर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडोडोरा औद्योगिक क्षेत्रातील या युनिटमधून तब्बल १२४ हून अधिक जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्यानं त्यांचे प्राण बचावले आहेत.
कडोडोराचे पोलीस निरीक्षक हेमंत पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीवा पॅकेजिंग कंपनीमध्ये पहाटे जवळपास ४.३० च्या सुमारास आग लागल्यानं ही दुर्घटना घडली. पहिल्या मजल्यावर लागलेली ही आग अगदी काही वेळातच इतर मजल्यांवरही पसरली.
इमारतीत अडकून पडलेल्या श्रमिकांना बाहेर काढण्यासाठी हायड्रोलिक क्रेनचा वापर करण्यात आला. अद्याप आगीचं कारण समजू शकलेलं नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जखमींना सूरतच्या स्मीमेर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
इमारतीतील ज्या युनिटमध्ये ही आग लागली त्यात साडी पॅकिंग, बॅग आणि मास्क बनवण्याचं काम सुरू होतं. या युनिटचं नाव ‘चिरायु पॅकेजिंग मिल’ असं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times