हायलाइट्स:

  • आमदार अतुल भातखळकर यांचा शरद पवारांना टोला
  • महाविकास आघाडीच्या भवितव्यावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
  • देगलूर बिलोलीमध्ये आघाडीचं भवितव्य दिसेल – भातखळकर

मुंबई: ‘महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (शरद पवार) यांनी व्यक्त केला आहे. पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (अतुल भातखळकर) यांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री व नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया सुरूच आहेत. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. त्यातच राज्यातील सरकारबद्दलही अफवा पसरवल्या जात असल्याची सत्ताधाऱ्यांची भावना आहे. या विरोधात शरद पवार आक्रमकपणे मैदानात उतरले असून विरोधकांचे आरोप खोडून काढत आहेत. तसंच, सत्ताधारी आघाडीतील पक्षांनाही दिलासा देत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल भाकीत केलं होतं. ‘काहींनी मी पुन्हा येणार, अशा घोषणा दिल्या मात्र, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. आता राज्यातील सरकार स्थिर आहे. त्यामुळं तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही दबावतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्ही काहीही करू शकता. तरीही आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि राज्यातील पुढचं सरकारही महाविकास आघाडीचंच असेल,’ असं पवार यांनी म्हटलं होतं.

पवारांच्या त्याच वक्तव्याचा धागा पकडत अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलं आहे. महाविकास आघाडीचं भवितव्य जनतेनं एकदा पंढरपूरला दाखवून दिलंच आहे. आता पुन्हा देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही,’ असा टोला त्यांनी शरद पवारांना हाणला आहे.

अतुल भातखळकरांनी ट्विट केले

आमदार अतुल भातखळकर यांचं ट्वीट

हेही वाचा:

भाजपविरोधात फक्त शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी बोलायचं का?; आघाडीच्या मंत्र्यांवर राऊत संतापले

‘काश्मीरमध्ये दहशतवाद वाढलाय; ईडी, NCB आणि सोमय्यांना तिकडं पाठवा’

‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर भयंकर अपघात; सहा वाहने एकमेकांना धडकली, ३ ठार

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here