हायलाइट्स:
- मुंबई, पुणे आणि नागपूरदरम्यान धावणार फेस्टिव्हव स्पेशल ट्रेन
- कोणत्या ठिकाणी थांबेल ट्रेन ?
- वाचा संपूर्ण वेळापत्रक
मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रवास करण्यास इच्छुक असणाऱ्यांना भारतीय रेल्वेच्या वेब पोर्टल किंवा एनटीईएस अॅपवर सविस्तर माहिती मिळू शकते. प्रवाशांना हवे असल्यास ते ‘रेलमाड हेल्पलाईन नंबर’ १३९ वर देखील संपर्क साधू शकतात. फेस्टिव्हल विशेष रेल्वे सेवांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान केंद्र सरकारने जारी केलेल्या सर्व कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे.
नागपूर-करमाळी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष
०१२३९ सुपरफास्ट स्पेशल ट्रेन ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूरहून १५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४.३० वाजता करमाळीला पोहोचेल.
कोणत्या ठिकाणी थांबेल ट्रेन ?
ही ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्टेशनवर थांबेल.
मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन
०१२४७ सुपरफास्ट स्पेशल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शुक्रवारी २९, ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान २२.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
०१२४८ सुपरफास्ट स्पेशल ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूरहून १७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
कोणत्या ठिकाणी थांबेल ट्रेन ?
या गाड्या कल्याण, इगतपुरी (फक्त ०१२४८ साठी), नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबतील.
पुणे-भगत की कोठी साप्ताहिक विशेष ट्रेन
०१२४९ विशेष ट्रेन २२ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी २०.१० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.५५ वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल.
०१२५० साप्ताहिक विशेष ट्रेन २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान दर शनिवारी भगत की कोठी २२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.०५ वाजता पुण्याला पोहोचेल.
कोणत्या ठिकाणी थांबेल ट्रेन ?
लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, भिल्डी, धनेरा, राणीवाडा, मारवाड भीनमल, मोड्रान, जालोर, मोकलसर, समधारी आणि लुनी.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times