हायलाइट्स:

  • मृत वकिलाचं नाव भूपेंद्र सिंह
  • घटनेनंतर अज्ञात आरोपी फरार
  • पोलिसांचा अधिक तपास सुरू

शहाजहानपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका जिल्हा न्यायालय परिसरात एका वकिलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. न्यायालयाच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर वकिलाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी पोलिसांना एक बंदूकही आढळली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत वकिलाचं नाव भूपेंद्र सिंह असल्याचं समोर येतंय. या घटनेंतर विरोधी पक्ष काँग्रेसकडून राज्यातील कायदे-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय.

प्राथमिक माहितीनुसार, एका व्यक्तीशी बोलत असतानाच अचानक परिसरात उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना गोळीबाराचा आवाज ऐकू आला… त्यानंतर अॅड. भूपेंद्र सिंह जमिनीवर धाडकन कोसळल्याचं दिसून आलं.
Gujarat: सूरतमध्ये साड्यांच्या पॅकेजिंग युनिटला आग, दोन मजुरांचा होरपळून मृत्यू
India Nepal: भारतीय हद्दीत नेपाळी विमान दाखल, ४०० मीटरपर्यंत आत घुसून माघारी परतलं
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मारेकरी तरुण एकटाच असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीतून समोर येतंय. घटना घडली तेव्हा त्यांच्या आजुबाजुला कोणतीही व्यक्ती उपस्थित नव्हती. फॉरेन्सिक टीम आपलं काम करत आहे. हत्येच्या वेळची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

मृत भूपेंद्र सिंह यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाकडून तरी एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. आम्ही घटनास्थळी पोहचलो तेव्हा मृत भूपेंद्र सिंह यांच्या मृतदेहाजवळ एक देशी पिस्तूल आढळून आलं.

भूपेंद्र सिंह हे अगोदर एका बँकेत काम करत होते. गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांनी वकील म्हणून प्रॅक्टीस सुरू केली होती.

IMD Alert: केरळ, दिल्ली, उत्तराखंडात पावसाचा धुमाकूळ; सतर्कतेचा इशारा
देशभरात शेतकऱ्यांचा रेल रोको : लखनऊमध्ये कलम १४४ लागू

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here