हायलाइट्स:

  • आर्यन खानच्या सुरक्षेत केली वाढ
  • आर्यन खानला स्वतंत्र बॅरेकमध्ये पाठवले
  • अधिकारी स्वतः ठेवत आहेत आर्यनवर लक्ष

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गाैरी खान सध्या त्यांच्या मुलाच्या अटकेमुळे प्रचंड चिंतेत आहेत. अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी मुलगा आर्यन खान सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात बंदीस्त आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीकडील कोठडी संपल्यानंतर आर्यनसह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार कारागृहातील अधिकाऱ्यांनी आर्यन खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. असेही बोलले जात आहे की, आर्यन खानला स्वतंत्र बॅरेकमध्ये पाठवण्यात आले असून अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

जेलमध्ये ३ हजार २०० कैद्यांसोबत राहतोय आर्यन खान

एका वृत्तामध्ये सांगितले आहे की, आर्यन खान कारागृहातील अमली पदार्थ प्रकरणातील अन्य आरोपींसोबत बोलत नाही. तसेच त्याला तुरुंगातील परिस्थिती आणि तिथल्या जेवणाचा स्वीकार करताना अडचणी येत आहेत, ज्यामुळे अधिकाऱ्यांना त्याच्या आरोग्याविषयी चिंता वाटत आहे.

आर्यन खान

शाहरुखने आर्यनला पाठवली ४ हजार ५०० रुपयांची मनी ऑर्डर

कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानला ११ ऑक्टोबर रोजी ४ हजार ५०० रुपयांची मनी ऑर्डर आली होती. आर्यन ही मनी ऑर्डर वडील शाहरुखने पाठवली होती. या मिळालेल्या पैशांचा वापर आर्यन कारागृहातील कॅंटींनच्या खर्चासाठी करु शकतो. कारागृहाच्या नियमानुसार, एका कैदीला एक महिन्यासाठी केवळ ४ हजार ५०० रुपयांची मनीऑर्डर मागवण्याची परवानगी आहे.

बिग बी नाही तर मग पूजा सावंतच्या खांद्यावर कोणाचा हात?

गेल्या काही दिवसातील एका वृत्तानुसार, आर्यन खानने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना त्याने भविष्यात चांगले काम करेल असे वचन दिले आहे. एक दिवस वानखेडे यांना त्याचा अभिमान वाटेल, असेही त्याने वानखेडे यांना सांगितले आहे. वृत्तामध्ये असेही म्हटले आहे की, आर्यनने एनसीबी अधिकाऱ्यांना तो कारागृहातून बाहेर पडल्यानंतर एक चांगला माणूस होईल असं वचन दिलं आहे. तसंच तो आर्थिकरित्या कमकुवत असलेल्या लोकांची मदत करेल. आर्यन खानचे समीर वानखेडेसह एनसीओ वर्कर्सकडूनही समुपदेशन करण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here