फेब्रुवारीत भारतात केवळ ४६ टन सोने आयात करण्यात आलं. सोनं खरेदी करणारा भारत हा जगातील दुसरा मोठा ग्राहक आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत सोने नव्या उच्चांकावर गेल्याने मागणी कमी झाली आहे. केंद्र सरकारने सोनं आयातीची आकडेवारी बुधवारी जाहीर केली. ज्यात फेब्रुवारीत ४६ टन सोने आयात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात देशात ७७.६४ टन सोने आयात करण्यात आलं होतं.
वाचा :
सोन्यातील तेजी आणि मागणी कमी झाल्याने मार्च महिन्यातसुद्धा आयातीत मोठी घसरण होईल, अशी भीती बुलियन ट्रेडर्सनी व्यक्त केली आहे. मागणी कमी झाल्याने काही ट्रेडर्स सोन्यावर प्रती औंस १४ डॉलर्सचा डिस्काउंट देत आहेत. दरम्यान, नुकताच पार पडलेला जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशनल कौन्सिलच्या ज्वेलरी एक्झिबिशकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे सोने विक्रीवर परिणाम झाला. नजीकच्या काळात सोन्याच्या दरात घसरण होईल, असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
चीनमधील करोना व्हायरसमुळे भांडवली बाजारात जोरदार पडझड झाली आहे. गुंतवणूकदार शेअर्समधील गुंतवणूक काढून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून कमॉडिटी बाजारात सोने दराने नवा विक्रमी स्तर गाठला आहे. मल्टी कमॉडिटी बाजारात सोने ४३७८८ रुपयांच्या उच्चांकी स्तरावर गेले होते. जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर २०१९ मध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times