मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत अनेकदा तक्रार करण्यात येते. या महामार्गाच्या गोंधळाविरोधात मनसे रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी मागच्या काही महिन्यात आंदोलन केले होते. याच मुद्द्यावरून त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी महामार्गाच्या दुरवस्थेचे खापर काँग्रेस-राष्ट्रवादीवर फोडलं आहे.

मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि रस्ते आस्थापना कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूरच्या घरी भेट घेतली. यावेळी गडकरी म्हणाले की, ‘त्या काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय. पण माझं वैयक्तिक लक्ष आहे या रस्त्यावर. मी कोकणाला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार, हा माझा शब्द आहे आणि मी शब्द पाळतो. म्हणूनच कामाची गती वाढवण्यासाठी ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडला आहे त्या दोन कॉन्ट्रॅक्टरला मी बदलत आहे.’

‘तुम्ही गुरू माँ असाल किंवा गुरू पिता; बाळासाहेबांच्या मुलाला सर्टिफिकेट देऊ नका’

राज ठाकरेंना दिला निरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यामुळे या शिष्टमंडळाला भेटल्यावर ‘साहेबांना सांगा हा विषय मी लवकरच संपवतोय’ असा निरोपही गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिला.

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था सुधारणा का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here