हायलाइट्स:

  • राज्याला आज मोठा दिलासा
  • गेल्या काही दिवसांतील सर्वांत कमी नवीन करोना रुग्णांची नोंद
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४ टक्के

मुंबई: करोनाचा संसर्ग कमी होत असताना राज्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसांतील सर्वांत कमी नवीन करोना रुग्णांची नोंद (महाराष्ट्र कोरोना प्रकरणे अपडेट) आज करण्यात आली आहे. राज्यात आज १ हजार ४८५ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे.

मुंबईत रविवारी एकाही करोना रुग्णाचा मृत्यू न झाल्याने समाधान व्यक्त केलं जात असतानाच राज्यात आज करोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे. आज २ हजार ०७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,२१,७५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४ टक्के एवढं झालं आहे.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी यंदा कठोर निर्बंध; आमदारांनाही असणार ‘या’ अटी

राज्यात आज २७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,११,१६,३५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९३,१८२ (१०.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,६१३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोणत्या ४ जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या अधिक?

राज्यात आज रोजी एकूण २९ हजार ५५५ सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील सर्वात जास्त रुग्णांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला मुंबईत ५ हजार ९९७, पुण्यात ८ हजार २८१, ठाण्यात ३ हजार ७९८ आणि अहमदनगरमध्ये ३ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here