सोलापूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा फायदा घेऊन बेकायदेशीररित्या केमिकल मिश्रित डिझेल निर्मिती आणि विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. सोलापूरच्या गुन्हे शाखेने हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे सोलापूरच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी नऊ आरोपींना अटक केली असून एकूण 17 कोटी रुपयांची मालमत्ता आणि मुद्देमाल जप्त केला आहे.

सोलापूर : सोलापूर शहरातील पुणे- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत मोकळ्या जागेत काही जण स्वतःचे बेकायदेशीरपणे  डिझेलसारखा ज्वलनशील द्रव पदार्थ आणून टँकरमधून बसमध्ये भरत असल्याचे माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. कारवाई दरम्यान आरोपींकडून पालघर येथील साई ओम पेट्रोस्पेशालिटीज लिमिटेड या कंपनीतून हे बनावट डिझेल आणले असल्याची माहिती मिळाली. सोलापूर गुन्हे शाखेचे दोन पथक हे तातडीने पालघर येथे रवाना करण्यात आले.

पालघर येथील साई ओम पेट्रो स्पेशिलीटीज लिमिटेड या कंपनीस रिसायकल ऑईल व्यवसायाचा परवाना असताना ते केमीकलच्या सहाय्याने डिझेल तयार करून विक्री करीत असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले. तसेच त्यासाठी सदर कंपनीत मशीनरी वेगवेगळ्या रासायनिक द्रव पदार्थाच्या साठयासाठी आणि बेकायदेशीरपणे भेसळ करण्यासाठी स्थापीत केली असल्याचे निष्पन्न झाले.  त्यामुळे गुन्हे शाखेच्या कंपनीची मशीनरी, मालमता आणि जमिन अशा प्रकारे सुमारे 16 कोटी 19 लाख 90 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  सध्या डिझेलचे दर शंभरीवर पोहोचले असताना हे डिझेल 65 रुपयेला विकले जात होते. अशी माहिती आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे.

बेकायदेशीररित्या केमिकल मिश्रित डिझेल निर्मिती आणि विक्री करणारी टोळी जेरबंद

तसेच सोलापुरात ज्या आकांक्षा लॉजिस्टकच्या बसेस मध्ये हे बनावट डिझेल भरले जात होते त्याच्या तीन बसेस, 1 टँकर असा एकूण 1 कोटी 1 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला करण्यात आला आहे. तर घटनास्थळावरून तानाजी कालीदास ताटे, रा. गुणो मानेगाव, ता. बार्शी, जि सोलापूर, युवराज प्रकाश प्रबळकर, रा. पंचशील नगर, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर तसेच आकांक्षा लीजिस्टीक कार्यालयातील मालक अविनाश सदाशिव गंजे, ( भवानी पेठ, चडचणकर अपार्टमेंट, सोलापूर), सुधाकर सदाशीव गंजे (वय 44 वर्षे अवंती नगर, पुना नाका, सोलापूर) तसेच मॅनेजर श्रीनिवास लक्ष्मण चव्हाण (अभिषेक नगर, हॉटेल अम्बेसीडर जवळ), सोलापूर बसवरील चालक हाजु लतीफ शेख ( मुपो कौडगाव, ता. जि. उस्मानाबाद) आणि तपासादरम्यान सहभाग निश्चित झाल्याने हिमांशु संजय भुमकर (वय 21 वर्षे, रा. भुमकर कॉलनी, बार्शी रोड, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बेकायदेशीररित्या केमिकल मिश्रित डिझेल निर्मिती आणि विक्री करणारी टोळी जेरबंद

सद्यस्थितीत गुन्ह्याचा तपास सुरू असून साई ओम पेट्रो स्पेसिलीटीज लिमिटेड या कंपनीने बेकायदेशीर डिझेल बनविण्यासाठी लागणारे केमिकल कोणत्या ठिकाणाहून आणले या संबंधाने तपास सुरू आहे, अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त बापू बांगार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here