विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात आज शिवस्मारकाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत असून, त्यांचे भव्य स्मारक जलदगतीने झाले पाहिजे. मात्र या स्मारकाच्या निर्मितीसाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर महालेखाकारांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. शिवाय पर्यावरणाच्या अनुषंगाने न्यायालयांमध्ये विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्तास शिवस्मारकाचे काम मागील वर्षभरापासून थांबलेले आहे. तसेच मागील पाच वर्षांत या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामात विशेष प्रगती झालेली नसल्याची माहिती देत अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस सरकारला लक्ष्य केले.
वाचा:
दरम्यान, मुंबईच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times