जगातील दुसऱ्या क्रमांकाचा टोमॅटो उत्पादक देश
देशातील वेगवेगळ्या शहरांत ५० रुपयांपासून ते जवळपास ९३ रुपयांपर्यंत टोमॅटोच्या किंमती आढळून येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, चीननंतर भारत हा जगातील सर्वाधित उत्पादन घेणारा देश आहे.
पिकांचं नुकसान
देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. बाजारपेठांमध्ये माल पोहचण्यासाठी झालेल्या नुकसानीमुळे टोमॅटोच्या किंमतीत वाढ झालीय. टोमॅटोचं पुढचं उत्पादन आता दोन – तीन महिन्यांनी बाजारात येण्याची शक्यता आहे.
किरकोळ बाजारातील किंमती
कोलकाता शहरातील किरकोळ बाजारात टोमॅटोच्या किंमती ९३ रुपये किलोपर्यंत पोहचल्या आहेत. ही किंमत जवळपास डिझेलच्या सध्याच्या किंमतींच्या बरोबरीत आहे.
तर, चेन्नई शहरातही सोमवारी टोमॅटो ६० रुपये किलो दराने मिळत असल्याचं दिसून आलं.
राजधानी दिल्लीत टोमॅटो ५९ रुपये किलो तर आर्थिक राजधानी मुंबईत ५३ रुपये किलोपर्यंत किंमती पोहचल्या आहेत.
ग्राहक मंत्रालयाकडून देशातील १७५ शहरांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत ५० हून अधिक शहरांत ग्राहकांना एक किलो टोमॅटोसाठी ५० रुपयांहून अधिक किंमत मोजावी लागत असल्याचं समोर आलंय.
घाऊक बाजारातील किंमती
इतकंच नाही तर घाऊक बाजारातही टोमॅटोची किंमत अधिक असल्याचं दिसून येतंय. कोलकातातील घाऊक बाजारात टोमॅटो ८४ रुपये, चेन्नईत ५२ रुपये, मुंबईत ३० रुपये आणि दिल्लीत २९.५० रुपये किलो दरानं उपलब्ध होत आहेत.
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किंमतीनंतर आता स्वयंपाक घरावरही महागाईचा परिणाम दिसून येणार, हे आता स्पष्ट आहे
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times