हायलाइट्स:

  • ‘डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री पद स्वीकारले नाही’
  • ‘शुगर आणि बीपी हे आजार लावून घेणारे हे खाते’
  • जयंत पाटील यांच्या राजकीय नेत्यांना कानपिचक्या

सांगली : आर. आर पाटील यांच्यानंतर गृहमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे येणार होती. तेव्हा आबांनी मला विचारलं, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे काय? शुगर आहे काय? यावर मी नाही असं उत्तर दिलं. मग हे दोन्ही आता तुम्हाला होईल, असं त्यांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच. गृहमंत्रीपद घेतल्यानंतर मला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला, अशी माहिती खुद्द जयंत पाटील यांनी आज सांगलीतील एका कार्यक्रमात दिली. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दमदाटी करण्यासाठी जाऊ नये, तर पोलिसांना पाठबळ देण्यासाठी जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना पाटबंधारे मंत्री जयंत पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षांत राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्याकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदली करण्याची भीती दाखवण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून केवळ समोरच्याचे समाधान होते. परंतु पोलिसांना त्यांचे काम करू द्या. पोलिसांचे मनोध्यर्य वाढवावे लागेल. राजकीय नेत्यांनी त्यांना पाठबळ द्यावे लागेलं. केसेस आणि बदलीच्या कामापुरतेच पोलीस ठाण्यात जाऊ नका, पोलिसांना पाठबळ देण्यासाठी पण पोलिस ठाण्यात जा. अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या. सांगली मधील विश्रामबाग येथे नतून पोलिस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील हे बोलत होते.

इतकंच नाहीतर ब्लड प्रेशर वाढतं आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी आता गृहमंत्री पद स्वीकारले नाही, असा खुलासाही जयंत पाटलांनी यावेळी केला. मी गृहमंत्री पद न घेण्याबाबत अजित दादांनी जे काही माझ्या बाबतीत सांगितले ते खरंच आहे, असंही ते म्हणाले.

घरगुती भांडणातून पतीने स्वतःच्याच घराला लावली आग; आजूबाजूची दहा घरंही जळून खाक
गृह खाते सांभाळताना गृहमंत्र्यांवर मोठा ताण असतो. तर मग फिल्डवर काम करणाऱ्या पोलिसांना किती ताण तणाव असू शकेल, हे पण समजून घेणे गरजेचे आहे. मी गृहमंत्री झाल्यानंतर आर. आर. आबांना या गृहखात्याबाबत विचारले होते. त्यांनी शुगर आणि बीपी हे आजार लावून घेणारे हे खाते आहे, असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे गृहखाते घेतल्यानंतर मला बीपीचा त्रास सुरू झाला. माझ्या पी. ए. नाही शुगर आणि बीपीचा त्रास होऊ लागला. कामाच्या ताणामुळे मंत्र्यांना एवढा त्रास होत असेल तर, पोलिसांना कामाचा ताण किती असेल हे लक्षात येते. तो दूर करण्यासाठी उपक्रम राबवा. त्यांना तीन – चार दिवस फिरण्यासाठी सुट्टी द्या, अश्या सूचनाही जयंत पाटील यांनी यावेळी दिल्या.
राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी, पुण्यात निनावी पत्रामुळे राजकीय खळबळ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here