या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्यात पालकांना आवाहनही करण्यात आले आहे. आपल्या मुलांना आराम करण्यास, खेळण्यास आणि व्यायाम करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. या मसुद्यावर या आठवड्यात एनपीसीच्या स्थायी समितीत चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सध्या ऑनलाइन गेमिंग आणि इंटरनेट सेलिब्रेटींचे भक्त होण्याविरोधात सरकारने मोहीम सुरू केली आहे. चीनने ऑनलाइन व्हिडिओ गेमला ‘अध्यात्मिक अफू’ची संज्ञा दिली आहे.
चीनमधील शिक्षण मंत्रालयाने लहान मुलांच्या व्हिडिओ गेम खेळण्याच्या तासावर बंधने घालण्यात आली आहेत. या लहान मुलांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी फक्त एकच तास ऑनलाइन गेम खेळण्याची परवानगी आहे. त्याशिवाय चीनने लहान मुलांचा गृहपाठ कमी करण्याचे आदेश दिले आहेत. सुट्टीच्या दिवशी शिकवणी घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांवर अभ्यासाचा ताण वाढत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times