हायलाइट्स:
- किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच बोलले रोहित पवार
- ‘किरीट सोमय्या आम्हाला चॅलेंज करणारे कोण?’
- रोहित पवारांची किरीट सोमय्यांवर टीका
पवार कुटुंबियांवर आरोप करणारे किरीट सोमय्या ईडी आणि आयटीचे प्रवक्ते आहेत का? असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. ‘माझ्याकडे पवार कुटुंबियांबरोबर बेनामी संपत्तीचे पुरावे आहेत. ते पुरावे पवार कुटुंबीयांनी चुकीचs असल्याचे सिद्ध करून दाखवावे’ असं चालेंज किरीट सोमय्या यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
आमच्यावर ईडी आणि आयटी कारवाई करेल पण किरीट सोमय्या आम्हाला चॅलेंज करणारे कोण? असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. देवदर्शनासाठी रोहित पवार हे नांदेड इथे आले असता ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
काय होते सोमय्या यांचे आरोप?
किरीट सोमय्या हे रविवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शांतीसागर मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेवर टीका केली.
‘ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेल्या शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे. माझ्याकडे असलेले कागदोपत्री पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय आणि सीबीआयकडे देणार आहे,’ असं सोमय्या यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार ही दरोडेखोरी असल्याची टीकाही त्यांनी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times