पोपट ‘मिसिंग’ असल्याची नोंद पोलिसांनी केलीय आणि पोपट आढळल्यास पोलिस स्टेशनला माहिती देण्यात यावी, असा आदेशही काढला आहे. आत्ता बोला! पोपट उडाल्याच्या तक्रारीची चर्चा बुधवारी पोलिस वर्तुळात चांगलीच रंगली. विनोदकुमार माहोरे यांनी ही तक्रार केली आहे.
झिंगाबाई टाकळीतील महाराणानगरमध्ये विनोदकुमार माहोरे राहतात. ते वेकोलित वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे आफ्रिकन ग्रे जातीचा ‘ब्राव्हो’ नावाचा पोपट होता. मंगळवारी सायंकाळी ब्राव्हो पिंजऱ्यातून उडाला. माहोरे यांनी ब्राव्होच्या विस्तृत वर्णनासह मानकापूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तो बेपत्ता असल्याची नोंद घेत ‘मिसिंग नंबर’ दिला. पोपट आढळल्यास त्याची सूचना पोलिसांना देण्याची सूचनाही तक्रारीवर करण्यात आली. ही असली तरी त्याची नोंद घेणे हा पोलिसांवरील विश्वास असल्याचीच प्रतिक्रिया उमटत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times